‘चेर्नोबिल’ : सिमेंटची थडगी हजारो वर्षे पुरावा म्हणून काम करणार, अणू नको तिथं फोडण्याची किंमत म्हणून!
चेर्नोबिलला चार रिअॅक्टर्स असलेली एक अणुभट्टी होती. तिथलेच काही तंत्रज्ञ एक चाचणी घेत होते. त्यात गफलत झाली आणि चारपैकी एका रिअॅक्टरचा स्फोट झाला. त्यातून बाहेर निघालेली आग, धूर, राख, अणुभट्टीच्या अवयवांचे तुकडे सगळीकडे पसरले. वाऱ्याबरोबर आकाशात पसरले. वाऱ्याला जाती-धर्माच्या, राष्ट्र-राज्याच्या, नैतिकतेच्या, सत्य-असत्याच्या मर्यादा नसतात. वारा पार स्वीडनपर्यंत पसरला. आता बातमी दडवून ठेवणं शक्य नव्हतं.......